राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे राऊत आणि पवार यांचे उद्या नामांकन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे खा. संजय राऊत आणि संजय पवार दोन उमेदवारांच्या नावांवर निश्चिती झाली असून ते गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास असहमती दर्शवल्याने शिवसेनेतर्फे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले.

संजय पवार हे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते असून महानगरपालिका माजी नगरसेवक ते थेट राज्यसभेचे उमेदवार अशी त्यांची कारकीर्द आहे. अशा कार्यकर्त्याचे नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत येणे हा बहुमानच आहे. संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

दरम्यान शिवसेनेतर्फे राज्यसभेसाठी दोन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज उद्या गुरुवारी दुपारी १ वाजता भरणार असल्याचे खा. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

 

Protected Content