पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया’ या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी २०२५-२६ या वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल.
नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये भिका तुकडू चौधरी (पारोळा, जळगाव) आणि गोरख तावरे (कराड, सातारा) यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच, सुभाष लहाने (बुलढाणा) यांची राज्यसचिवपदी, तर सुमित सुनीलराव कुलकर्णी (श्रीरामपूर) यांची राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ. तेजस्विनी सूर्यवंशी (सांगली) या जबाबदारी सांभाळतील. याव्यतिरिक्त, नेताजी मेश्राम (गडचिरोली) यांची संघटन सचिवपदी, हेमंतू देसाई (धर्माबाद, नांदेड) यांची सहसचिवपदी, आणि भीमराव उल्हारे (अहिल्यानगर) यांची संघटन सहसचिवपदी निवड झाली आहे.
राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. सुमन लक्ष्मण वाकडे (परळी वैजनाथ), भगवान नागोराव शहाणे (छत्रपती संभाजीनगर), रवींद्र वाघ (बुलढाणा), सौ. शोभा जयपुरकर (नागपूर), आणि ओम प्रकाश शिंदे (जालना) यांचा समावेश आहे.
विविध विभागांचे अध्यक्ष म्हणून आत्मलिंग शेटे (छत्रपती संभाजीनगर), अजित रामनाथ पाटील (कोकण-उरण, रायगड), मुकुंद जोशी (नागपूर-गडचिरोली), विलास कट्यारे (नाशिक), सम्राट दिलीप सनगर (कोल्हापूर), विजय देशमुख (अमरावती-अकोला), आणि विठ्ठलराव भानुदास राव राऊत (लातूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच, अनेक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. धनंजय कीर्तने (जळगाव), नंदलाल जगताप (नाशिक), महेश आनंदा लोंढे (पुणे), डॉ. सिद्राम आप्पा येलगरे (सोलापूर), मंगलताई हिवाळे (छत्रपती संभाजीनगर), अमित अनिल कुलकर्णी (जालना), दिगंबर माणिकराव सोळंके (बीड), डॉ. प्रल्हाद शिंदे (हिंगोली), माहेश्वरी कैलास गायकवाड (नांदेड), खंडू नागू इंगळे (सातारा), जितेंद्र पितळे (अहिल्यानगर), चेतनसिंग राजपूत (नंदुरबार), भालचंद्र पाटील (धुळे), बंडू कुमार धावणे (अमरावती), शौकत शहा घासी शहा (बुलढाणा), आकाश नंदू कोकाटे (अकोला), विक्रम सिंह पवार (कोल्हापूर), आशिष अतुल पाटील (रायगड), आणि मनसुख भट्टी (यवतमाळ) यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एक कोअर कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे. यात आप्पासाहेब पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष), प्रवीण पाटील (राष्ट्रीय सचिव), प्रदीप कुलकर्णी (राज्य अध्यक्ष), गोरख तावरे (राज्य उपाध्यक्ष), भिका चौधरी (राज्य उपाध्यक्ष), सुमित कुलकर्णी (राज्य संघटक), आणि सुभाष लहाने (राज्यसचिव) यांचा समावेश आहे. या सर्व नियुक्त्या संघटनेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरतील अशी अपेक्षा आहे.