अंचळगाव तांडा येथे शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

tanda

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अंचळगाव तांडा जि.प.प्रा. शाळेत वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र राठोड आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक क्रुष्णा एन.पाटील, प्रशांत पाटील, अभिराज चव्हाण आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी संतश्री सेवालाल महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फ़ुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.आणि सांस्क्रुतिक कार्यक्रमाला सुरुवात औपचारिक रित्या सुरुवात झाली.

चिमूकल्यांनी उत्स्फूर्त कार्यक्रम सादर केले.उपस्थितांनी भरभरून दाद दिली आणि रोख स्वरूपात बक्षिसे जाहीर केलीत.या कार्यक्रमाला पीम्परखेड केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक खेळकर, भोंडण ग्रामपंचायती चे उपसरपंच डॉ.धनराज पाटील, पारोळा तालुका महिला शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष सिमा विठ्ठल पाटील, निकिता चौधरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सावित्रीमाई समूह सदस्या सिमा पाटील यांना बदली निमित्त शाळेतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.यावेळी केंद्रप्रमुख अशोक खेळकर यांनी उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सुरेंद्र बोरसे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.केंद्रप्रमुख अशोक खेळकर आणि सिमा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुलांच्या गुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश पाटील, योगेश परदेशी, शीतल चव्हाण, मेनका चव्हाण, शकूंतला राठोड, मदतनिस ताई यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विकास बोरसे यांनी तर आभार मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी मानले.

निता नावाच्या राशीचा राजकीय संयोग
जामनेर तालुक्यातील नेरी दिगरच्या सरंपच निता प्रभाकर पाटील, पाळधीच्या सभापती निता कमलाकर पाटील व पहूर पेठच्या सरंपच निता रामेश्वर पाटील या राशीचा राजकीय व यशस्वी संयोग पहावयास मिळत असून याची पहिली सुरवात जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी नेरीपासून केली आहे. त्यामुळे राजकारणात निता नावाच्या राशीचा प्रभाव दिसून येत असल्याची कबुली माजी जि.प सदस्य राजधर पांढरे यांनी यावेळी दिली आहे.

Add Comment

Protected Content