वडजीत पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलचा पराभव

 

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीचा निकाल हा तरूणांच्या बाजुनू कौल देणारा व परीवर्तन घडविणारा ठरला आहे. वडजीत विद्यमान पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत तरूणानी संघटीत होऊन तयार केलेल्या परिवर्तन पॅनलने बहूमत मिळवले. तर आमडद्यात प्रतापराव पाटील यांच्या पॅनल बहूमतापासून एक जागा दुर राहीला. गिरड, वाडे येथे चांगलीच चुरस पहायला मिळाली.

तालुक्यातील ३३ पैकी २९ ग्रामपंचायत निवडणुक निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. सकाळी १०-३० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तहसीलदार तृप्ती घोडमिसे यांच्या मार्गदर्शन खाली मतमोजणी सुरु झाली. सर्वप्रथम टपाल मतमोजणी करण्यात आली.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या १९६ जागाची मतमोजणी एकूण १० टेबलवर १० फेऱ्या घेण्यात आल्या. त्याकरीता एकूण ६० अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले होते. मतमोजणी धिम्म्यागतीने सुरु असल्याने निकाल उशिराने मिळत होते. यापूर्वीच तालुक्यात माणकी, पळासखेडा, लोण पिराचे, पाढरंद या ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्याची राजकीय राजधानी म्हणुन ओळख असलेल्या आमडदे येथे प्रथमच तीन पॅनलमध्ये लढत झाली. येथे मोठी चुरस पहावयास मिळाली किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या पॅनलला ६, शेखर शिवाजी पाटील यांच्या पॅनलला ५, तर नव्यानेच उदयास आलेल्या समिधा विकास पॅनलला २ जागा मिळाल्या आहे.

बात्सर येथे भाजपाचे भास्कर भिमराव पाटील यांच्या परीवर्तन पॅनलने ९ पैकी ९ जागावर विजय मिळविला बात्सर हे शिवसेनेचे जि.प सदस्य कल्पना पाटील याचे पती संजय पाटील यांचे गाव आहे हे विशेष. वाडे येथे १३ जागासाठी २७ उमेदवार रिंगणात होते. येथे जनसेवा पॅनलला ८ तर ग्रामविकास पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत.

गिरड येथे १५ जागासाठी ३६ उमेदवार रिंगणात होते. येथे मोठ्या प्रमाणात चुरस पहावयास मिळाली. येथे ग्रामविकास पॕनल ५, जनसेवा पॕनल २, गाव विकास पॅनल ७, तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. वडजी येथे तरुणाच्या संघटीत शक्तीचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. पत्रकार सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परीवर्तन पॅनलने ८ जागावर विजय मिळविला तर माजी सभापती रामकृष्ण पाटील यांच्या जनसेवा ग्राम विकास पॅनलला ३ जागावर समाधान मानावे लागले येथे १३ जागासाठी २४ उमेदवार रिगणात होते.

पिचर्डे येथे ९ जागासाठी १७ उमेदवार रिंगणात होते. दिपक महाजन, विनोद हेमराज पाटील, पत्रकार धनराज पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला ६ जागा तर माजी जि. प सदस्य श्रावण लिडायंत यांच्या परीवर्तन पॅनल ३ जागा मिळवण्यात यश आले. वलवाडी येथे प्रगती पॅनल ६ जागा तर ग्रामविकास पॅनल ३ जागा मिळाल्या. ग्रामविकास पॅनलच्या २ जागा ६ मताच्या तर १ जागा ८ मताच्या फरकाने पराभुत झाल्या. पिपरखेड येथे ११ जागासाठी २४ उमेदवार रिंगणात होते. येथे परीवर्तन पॅनलने ७ तर पारेश्वर पॅनलने ४ जागावर विजय मिळाला.

तालुक्यात भाजपाचे जोरदार प्रदर्शन

आज घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालात भडगाव तालुक्यात भाजपाने जोरदार प्रदर्शन केले असून खेडगाव, बात्सर, बोदर्डे, तांदुळवाडी, मळगाव, मांडकी या ६ ग्रामपंचायतीत स्पष्ट बहुमतासह तालुक्यात ३०९ जागांपैकी ३६ जागा बिनविरोध तर ७३ जागी कार्यकर्ते निवडून आले आहेत.
यापूर्वी एकही ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात नव्हती तर फक्त ४७ जागांवर भाजपाचे सदस्य होते. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत निकाल भाजपाचा उत्साह वाढविणारा आहे. बहुतेक ग्रामपंचायतीत भाजपा किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

वडजीत तरूणांनी केले परीवर्तन

वडजीत शिवसेनेचे माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समीती सदस्य रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलला अवघ्या ३ जागा राखता आल्या. तर तरूणांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या परीवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले. दोन जागा अपक्ष यांना मिळाल्या.

Protected Content