पाचोरा-भडगाव तालुक्यात घसरलेल्या टक्क्याने उडवली अनेकांची झोप

voting 1

पाचोरा ((प्रतिनिधी) जळगांव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यावेळी फारसा उत्साह दिसला नाही. बरेच राजकीय नेते व पदाधिकारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदारांनी अपेक्षित प्रतिसाद न देता पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. या आकडेवारीमुळे अनेकांची झोप उडाली आहे.

 

पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक असी मतदार जनजागृती अभियान राबवले होते. तरीही मतदानाची टक्केवारी कमी होणे, आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने स्थानिक राजकीय नेत्यांसाठी धक्कादायक ठरू शकते. कारण भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची विकास कामे, महागाई, बेरोजगारी, आरोग्य व सर्वसामान्य नागरिकाला लागणाऱ्या मूलभूत सुविधांची कमतरता, सरकारी कामासाठी प्रत्येक ठिकाणी शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत लूट होत असताना लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आणि धनशक्तीच्या जोरावरवर निवडणूक लढवून मतदारांना पैसे घेण्याची लावलेली सवय, या प्रकारांमुळे मतदारांमध्ये राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणांबद्दल मोठा राग निर्माण झाला असावा, म्हणूनही मतदानाची टक्केवारी घसरली असावी. निवडणुकीत नेते मंडळी बोलतात पण करून दाखवत नाहीत मात्र मतदार बोलत नाहीत पण करून दाखवतात..! मतदानाची टक्केवारी इतकी कमी का झाली असावी ? पाचोरा भडगावं विधानसभा मतदारसंघात ५२% मतदार हरवला कुठे ? या प्रश्नांनी सध्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची झोपुद्वाली आहे. त्याचवेळी सामान्य नागरिक मात्र हि चिंता सोडून निवडणुकीत बाजी कोण मारणार आणि कोणाचे सरकार येणार ? यासाठी निकालाकडे डोळे लावून वाट बघत आहेत.

Add Comment

Protected Content