Home Cities जळगाव जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
106


dead body 750x430

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील आर्वे येथील एक विवाहित महिला जळाल्याची घटना दि.१५ जून रोजी घडली होती. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काजल अफसर तडवी (वय २५) ही सहा महिन्यांची गर्भवती असताना १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरात गॅसवर स्वयंपाक करत असताना गॅसचा अचानक भडका होऊन अंगावरील साडी पेटल्याने भाजली होही. तिच्या नातेवाईकांनी तातडीने आग विझवून तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिच्या पोटातील बाळही मृत झाले आहे. आज (दि.२९) सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पी.एस.आय. किरण मेहेर करीत आहेत.


Protected Content

Play sound