भडगावातील नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई- मुख्यमंत्री ( व्हिडीओ )

mla kishor patil in vidhansabha

मुंबई प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत विमा कंपनी जाचक अट दाखवून दिरंगाई करत असल्याचा मुद्दा आज आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधीतांना भरपाई देणार असल्याची ग्वाही दिली.

याबाबत वृत्त असे की, भडगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी आलेले वादळ आणि पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. तथापि, दहा दिवस उलटूनही पंचनामे होत नसल्यामुळे आज आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, भडगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र पीक विमा कंपनीने या भागात ताशी ४० किलोमीटर वेगाच्या वार्‍याची नोंद नसल्याचे कारण देत दिरंगाई सुरू केली आहे. यामुळे याबाबत सरकारने लक्ष देऊन शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी आ. किशोर पाटील यांनी केली.

याला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी संबंधीत विमा कंपनीवर कारवाईचे संकेत देत भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळणार असल्याची ग्वाही दिली.

पहा : आमदार किशोर पाटीलांची मागणी व मुख्यमंत्री नेमके काय म्हणलेत ते !

Protected Content