पहूर पेठ पाणीदार करण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी – पं.स.सभापती निता पाटील

pahur

पहूर ता. जामनेर (वार्ताहर) । दुष्काळाशी दोन हात करतांना घाबरू नका,शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पहूर पेठ गावाला पाणी दार करण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपूरावा करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती निता कमलाकर पाटील यांनी मंगळवारी पहूर ग्रामस्थांना दिली आहे.

नवनियुक्त सदस्यांचा केला सत्कार
पाणी फाऊंडेशन वाँटर कप स्पर्धेत पहूर पेठ ,खर्चाना व सांगवी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने पेठ ग्रामपंचायत च्या वतीने पाणी फाऊंडेशन चे प्रशिक्षण घेतलेल्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सभापती निता पाटील बोलत होत्या. पाणी फाऊंडेशनची संकल्पना गावात राबविताना येणाऱ्या अडचणी पंचायत समिती च्या माध्यमातून मी सोडविण्याचे तुम्हाला वचन देते असेही पाटील यांनी सांगितले आहे.यावेळी नवनिर्वाचित सभापती निता पाटील यांच्या सह रेल्वे बोर्डाच्या सदस्यपदी निवड झालेले उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, संतोष पाटील, सुषमा चव्हाण, विद्या कुमावत, गयास तडवी, गणेश पांढरे, शेखचंद तडवी, सुकदेव पाटील, भाऊराव गोंधनखेडे, मिना भोई, अशोक पाटील, दिपक बारी, बाबूराव पाटील, गजानन गरूड, सुनिल सोनार यांचा सन्मान करण्यात आला आहे.

प्रशिक्षण घेतलेले सदस्यांनी यावेळी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेचे सखोल माहिती दिली. माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांनी याबाबत शिवारातील पाणी शिरवारात आडवून गाव पाणी दार करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पेठ च्या सरंपच निता पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे,पाळधीचे माजी सरंपच कमलाकर पाटील, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, मुन्ना पठाण, मिना पाटील, गोकुळ कुमावत, ग्रामविकास अधिकारी छत्रपाल वाघमारे, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले आहे.

निता नावाच्या राशीचा राजकीय संयोग
जामनेर तालुक्यातील नेरी दिगरच्या सरंपच निता प्रभाकर पाटील, पाळधीच्या सभापती निता कमलाकर पाटील व पहूर पेठच्या सरंपच निता रामेश्वर पाटील या राशीचा राजकीय व यशस्वी संयोग पहावयास मिळत असून याची पहिली सुरवात जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी नेरी पासून केली आहे. त्यामुळे राजकारणात निता नावाच्या राशीचा प्रभाव दिसून येत असल्याची कबुली माजी जि.प सदस्य राजधर पांढरे यांनी यावेळी दिली आहे.

Add Comment

Protected Content