पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट; भीषण आग

पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | पुण्यात सिलेंडर स्फोटाची मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. येथील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी दहा सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे समजत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनेच्या स्थळी दाखल झाल्या आहेत.

पुण्यातील विमान नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत अनाधिकृतरीत्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता तब्बल शंभर सिलेंडरचा बेकादेशीरपणे साठवण्यात आले होते. यामधील शंभर पैकी दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. सुदैवाने  अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आली आहे.

ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू होतं त्या ठिकाणा इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Protected Content