तालुक्यातील आंबे वडगाव येथील तरुणाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू

 

पाचोरा प्रतिनिधी । शहराबाहेरील वृंदावन हॉस्पिटलसमोर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर पलटी झाल्याचे आंबे वडगाव येथील तरूणचालकाचा दबुन जागीच ठार झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीसात नोंद करण्यात आली आहे. अपघातामुळे घरातील कर्ता पुरूष गेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आकाश शांताराम सोनवणे वय २५ रा. आंबेवडगाव ता. पाचोरा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा अपघात नेमका झाला कसा? कोणी केला? खरा आरोपी कोण? यासह अनेक प्रश्न अनुउत्तरित असुन या घटनेमुळे गांधारीची भुमिका घेतलेल्या महसुल व पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रनालिवर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती की, तालुक्यातील आंबेवडगाव येथील पवन विजय वाघ यांनी फिर्याद दिल्यावरुन मयत आकाश शांताराम सोनवणे याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रं. एम. एच. – १९ सी. झेड. – ८९४९) रेती भरून रेल्वे उड्डाण पुलावरून उतारावर वेगाने चालवित घेऊन येत असतांना सदरचे ट्रॅक्टर हे पल्टी झाल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबला गेल्यामुळे त्यास डोक्यास जबर मार लागल्याने तो मयत झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करित आहे.

मयत आकाश सोनवणे परिवारातील करता व कमावता मुलगा असल्याने आज रोजी हे कुटुंब उघड्यावर आले आहे. विशेष म्हणजे आकाश हा काम करून शिक्षण घेत होता. भविष्यात कुठेतरी नोकरी लागेल या अपेक्षेने तो पोलिस किंवा सैन्य भरतीत जाण्यासाठी दररोज व्यायाम, व अभ्यास करत होता. दिवसा काम व रात्री अभ्यास करणारा होतकरू मुलगा यांचे अपघाती निधन झाल्याने गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

चोरटी वाळू वाहतुक करणार्‍या या ट्रॅक्टरमुळे आज एका कुटुंबातील कर्ता तरूण गतप्राण झाला आहे. ही बातमी शहरात सकाळी जेंव्हा वार्‍यासारखी पसरली तेंव्हा मयत आकाश सोनवणे हा ट्रॅक्टर चालवत नव्हता तर पवन वाघ हा ट्रॅक्टर चालवत होता. आणि ट्रॅक्टरचा अपघात हा टायर फुटल्याने झाला अशाच चर्चेला उधान आले होते. तर पोलिसात पवन वाघ हा फिर्यादी आणी मयत आकाश सोनवणे हा आरोपी असल्याचे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणी सत्यता तपासणे गरजेचे असुन ज्या मार्गाने हे ट्रॅक्टर आले त्या मार्गावरिल सर्वच सी. सी. टी. व्ही. कॅमेरे चेक करणे अपेक्षित आहे. पोलिसांना फिर्यादिने दिलेल्या फिर्यादिची सत्यता पडताळल्यास सत्यता समोर येउन सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळेल.

Protected Content