इंग्रजी शाळांच्या प्रश्नांबाबत शाळा बंद आंदोलन यावल येथे यशस्वी

यावल (प्रतिनिधी)। इंडीपेंडंट इंग्लीश स्कुल असोशिएशन या संघटनेच्या माध्यमातुन मागील ५ ते ६ वर्षापासुन इंग्रजी शाळांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेकवेळा विविध स्तरावर निवेदने देण्यात येवुनही राज्य शासनाने याकडे कोणतेही लक्ष न दिल्यामुळे नाईलाजास्तव संघटनेच्या वतीने २५ फेब्रवारी २०१९ रोजी इंग्रजी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संदर्भातील एक निवेदन तालुका पातळीवरील शिक्षण विभागास देण्यात आले आहे.

इंडीपेंडंट इंग्लीश स्कूल असोशिएशनच्या वतीने संघाचे जिल्हा सचिव विजय देवचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी ई. आर. शेख यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा व वर्ष २०१२ ते २०१९ मधील २५ टक्के प्रवेशांचा थकीत फी परतावा तातडीने अदा करावा. राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा. स्वयंम अर्थसहाय तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावावर ऑनलाईन प्रक्रीया तातडीने सुरु करावी, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या इंग्रजी शाळा बंद आंदोलनात संपुर्ण राज्यातील सात हजार शाळा सहभागी झाल्या असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Add Comment

Protected Content