मविआचे दोन मंत्री रडारवर

मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्युज – महाविकास आघाडीतील दोन मंत्री रडारवर असून लवकरच घोटाळाप्रकरणी प्राप्तीकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आदी विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महाविकास आघाडीतील १२ मंत्र्यापैकी दोन जणांवर इडीकडून कारवाई झाली आहे, आता अजून दोन मंत्र्यांचा नंबर असून त्यात परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्या कंपनीत पैसा गुंतवला आहे, त्यात घोटाळा असून या कारभार चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाकडून दिले जाणार आहेत. परीवहन मंत्री परब यांचा नेहमीच रिसोर्ट संदर्भात कोणताही संबंच नाही असा दावा गेल्या पाच सहा महिन्यापासून केला जात आहे. परंतु कोविड काळात संसर्ग प्रतिबंधात्मक नियमाच्या आडूनआडून लॉक डाऊन केले आणि खरमाटे, वाझेंकाढून पैसे घेत रिसोर्ट बांधले आहे. या तक्रारीची दखल इडी, प्राप्तीकर विभाग आदी अधिकाऱ्यांनी घेतली असून १८ एप्रिलला सुनावणी आहे.
तर मुश्रीफ यांनी जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे देत सप्टेंबर महिन्यात त्यांनी माहिती उघडकीस आणाली होती. या कंपनीला मागील ८ वर्षात काहीच आवक नव्हती आणि २०१९-२० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. या कंपनीला कंत्राट देत घोटाळा झाला असून या घोटाळया संदर्भात कंपनी विभाग, प्राप्तीकर , ईडी आदी विभागाकडून लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Protected Content