इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढ विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनासमोर वाहनांची अंत्यसंस्कार विधी करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

या अनुषंगाने जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाअंतर्गत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांनी फाशी घेऊन केली आत्महत्या व वाहनांवार अंत्यसंस्कार करून  आगळ्या वेगळ्या पध्दतीने  मोदी सरकारच्या निषेध केला.

मराठे म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या मते घेतली निवडणून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील ८ दिवसात पेट्रोल, डिझेल ५.९० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते ११०० रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून आजपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही.

मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज पेट्रोल डिझेल दरवाढीला त्रस्त वाहनांनी आत्महत्या केली व त्या वहनांनावर युवक काँग्रेसच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ असा की भविष्यात अशाच प्रकारे दरवाढ राहिली तर खरच सर्व सामन्यांना वाहन चालविणे कठीण होईल व ते वाहन असेच धूळ खात पडलेले  राहतील म्हणजेच एकप्रकारे ते आपल्या आयुष्यातून निघून जातील व पायी फिरण्याची वेळ मोदी सरकारच्या कृपेमुळे होईल.

पेट्रोल- डिझेल दरवाढ न थांबल्यास पेट्रोल पंपा वरील मोदींच्या बॅनरर्सला काळे फसण्यात येईल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला इशारा दिला.

याप्रसंगी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ शोएब पटेल, मा प्रदेश सचिव बाबा देशमुख, जळगाव तालुक्याचे युवनेते मुरली सपकाळे, मकसूद पटेल, हर्षल दाणी , फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख ,अनिल सोळंखी, झाकीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content