बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

पाटणा वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली असून यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक झाली. यात भाजप, जेडीयू आणि मित्रपक्षांची एनडीए आणि राजद, काँग्रेस व मित्रपक्षांचे महागठबंधन यांच्यात प्रचंड चुरशीची लढत झाली. पहिल्यांदा ही लढत अगदीच एकतर्फी होणार असल्याचे वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात महागठबंधनने जोरदार आगेकूच केली आहे. निवडणुकीनंतरच्या बहुतांश एक्झीट पोलमध्ये हीच महाआघाडी सत्तेवर येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात विशेष करून तेजस्वी यादव यांच्या झंझावाती सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असून याचमुळे ही आघाडी जिंकण्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थात, येत्या काही तासांमध्येच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी सुरू करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्षात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमिवर, बिहारमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Protected Content