गलवान खोऱ्याचे अधिपत्य आणि सार्वभौमता आमचीच : चीन

बिजिंग (वृत्तसंस्था) भारतीय सैन्याने सीमेवरील संकेतांचे उल्लंघन केले आहे. तसेच सैन्याच्या कमांडर स्तरावरील एकमताने ठरवलेल्या नियमांचेही उल्लंघन केले आहे. भारताने त्यांच्या आघाडीवर असलेल्या सैन्यांच्या तुकड्यांना शिस्तीची समज द्यावी, शस्त्रसंधी उल्लंघन आणि चिथावणीखोर कृती करण्यापासून रोखावे. कारण गलवान खोऱ्याचे अधिपत्य आणि सार्वभौमता नेहमीच चीनच्या अखत्यारीत असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी म्हटले आहे.

 

 

चीन प्रवक्ते झाओ यांनी म्हटले की, भारताने संवाद आणि चर्चेच्या मार्गाने मतभेद सोडवण्याच्या योग्य मार्गावर यावे. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्याच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. या प्रकरणात काय चूक आणि काय बरोबर आहे हे खूप स्पष्ट आहे. ही घटना चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत घडली आहे. याचा दोष चीनला देता येणार नाही. चीनच्यावतीने आम्हाला आणखी संघर्ष नको आहे. दुसरीकडे भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात आलेले वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे, सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी धाडस आणि शौर्य दाखवत देशासाठी बलिदान दिले. जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Protected Content