यावल येथे नूतन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी स्वीकारला पदभार

यावल (प्रतिनिधी) । येथील तहसीलदार कुंदन हिरे यांची धुळे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी नूतन तहसीलदार जितेन्द्रकुमार कुंवर यांनी आज दुपारी आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली. सूत्रे घेतल्यावर कुंवर यांनी लगेचच तालुक्यातील सर्व मंडळधिकारी व तलाठी यांची तत्काळ बैठक घेवुन विविध कामांचा आढावा घेतला. तालुक्याबाबत साविस्तर माहीती आपल्या कर्मचाऱ्यांकडुन जाणुन घेतली. यावेळी तालुका तलाठी संघाच्या वतीने व मंडळ अधिकारी तसेच महसुल विभागाचे कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

Add Comment

Protected Content