विद्यापीठात संविधानिक जागरूकता अभियानातंर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संविधानिक जागरूकता अभियानातंर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संविधानिक मूल्य समाजात रूजणे गरजेचे असून देशात विविध जाती, धर्म, पंथ असतांनाही देश एकसंघ आहे. याचे श्रेय भारतीय संविधानाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी संविधानाचा, भारतीयत्वाचा आदर बाळगावा असे आवाहन आंनदराज आंबेडकर यांनी केले. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे होते. प्रमुख पाहूणे आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख प्रा. राकेश रामटेके, संजीव बौधनकर, काकासाहेब खंबाळकर, मिलिंद बनसोडे उपस्थित होते. सुकन्या जाधव हिने गीत सादर केले. डॉ. विजय घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. समाधान बनसोडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. राकेश रामटेके यांनी आभार मानले.

आनंदराज आंबेडकरांकडून कुलगुरूंचे अभिनंदन :

महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा परिषदेचे सदस्य म्हणून कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी विद्यापीठात कुलगुरूंची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. दूर्गम भागात असलेल्या या विद्यापीठाने महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केल्याबद्दल आंबेडकर यांनी कुलगुरूंचे कौतुक केले.

Protected Content