गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

फैजपूर/यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरुड येथील जि.प.प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण करण्यात आले. दरम्यान, या लोक वर्गणीतून विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले दिसून आले.

लोक वर्गणीतून शैक्षणिक साहित्य बूट, मोजे, टाय, बेल्ट इतर साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र सुरवाडे, उपाध्यक्ष तसेच समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य योगिता सुरवाडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे व शिक्षक महेंद्र सुरवाडे व धनश्री महाजन उपस्थित होते.

नवीन ड्रेस व साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना खुप आनंद झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सलीम तडवी तर आभार शिक्षक महेंद्र सुरवाडे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.