शिवसेनेतील तिन्ही फुटींसाठी शरद पवारच जबाबदार : केसरकर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”शरद पवार यांनीच छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना शिवसेनेपासून फुटण्याला फुस दिली असून आता शिवसैनिक याला बळी पडणार नाहीत”, अशा शब्दांमध्ये दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

आगामी राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक होत असून यासाठी शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीसाठी दिल्लीत आले असतांना त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले.

केसरकर म्हणाले की, शिवसेनेला आजवर तीनदा मोठ्या फुटीला सामोरे जावे लागले होते. या तिन्ही वेळेस संबंधीतांना फोडण्यासाठी शरद पवार यांनी मदत केली होती. किंबहुना त्यांचाच यात होत होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्या फुटीमागे शरद पवारांचा हात असल्याचे त्यांनी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं, असा दावा केसरकर यांनी केला. ते म्हणाले होते, राणेंना बाहेर पडण्यासाठी आपण मदत केली. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवली नाही. भुजबळांचं बंड तर पवारांमुळेच झाल्याचे जगजाहीर आहे. तर राज ठाकरे आणि पवार यांच्याविषयी सर्वांना ठावूक असल्याचे प्रतिपादन केसरकर यांनी केले. ज्यांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांना यातना दिल्या त्या शरद पवार यांच्यासोबत जाण्याची काय गरज होती ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी केसरकर पुढे म्हणाले की, शरद पवारांच्या दावणीला शिवसैनिक कधीही बांधली जाणार नाही. जनतेला शरद पवारांनी देखील धरू नये. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत होतं, असंही ते म्हणले.

Protected Content