पदवी, पदवीका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्जासाठी विद्यापीठाकडून मुदत वाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी ४ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते आता विलंबशुल्कासह २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे डिसेंबर, २०२२ आणि एप्रिल/मे/जून-२०२३ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पदवी / पदविका प्रमाणपत्रासाठी दि. ४ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि काही विद्यार्थ्यांनी व काही विद्यार्थी संघटनांनी केलेली मागणीच्या अनुषंगाने व प्राप्त आदेशानुसार पदवी/पदवीका प्रमाणपत्रासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner-> Examination-> Convocation वर उपलब्ध आहे. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.  ०५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर, २०२३  पर्यंत आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ५००/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १३००/- भरावे लागतील तसेच विलंब शुल्क रूपये १००/- असेल. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि.५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत आहे. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे. अर्ज भरतांना सूचनांचे तंतोतंत पालन करावे अर्जात अपूर्णता अथवा त्रुटी आढळून आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल व कोणतेही शुल्क परत करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी केले आहे.

Protected Content