नवीन विद्यापीठ कायद्याचे विद्यार्थ्यांना पेढे भरवून स्वागत (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने विद्यापीठ कायदा पारित केला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विद्यापीठ कायद्याचे स्वागत करून महाविकास आघाडीच्या वतीने आज मु.जे. महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

 

युवासेना, एन.एस.यु.आय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पेढे भरवून नवीन विद्यापीठ कायद्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रोहन सोनवणे, युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, यश सपकाळे, अमोल मोरे, तालुका युवाधिकारी सचिन चौधरी, किरण ठाकूर, शंतनू नारखेडे, संकेत कापसे, प्रितम शिंदे, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, सचिन हिवराळे, गिरीष सपकाळे, हितेश ठाकरे, चेतन कापसे, तेजस दुसाने, अमित जगताप, संदिप सुर्यवंशी, पियुष हसवाल, पियुष तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीने विद्यार्थी हिताचा नवीन विद्यापीठ कायदा केल्याचे घोषणा देऊन स्वागत करण्यात आले.

 

Protected Content