डॉ. बी. एन. पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेचे अलीकडेच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला देखील आहे. दरम्यान, मावळते सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांना अद्यापही पोस्टींग मिळाली नव्हती. दरम्यान, आज सायंकाळी राज्य सरकारने २० आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात डॉ. पाटील यांची रत्नागिरी येथील जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. बी.एन. पाटील हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे सांभाळणार आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!