भुसावळात खडसेंवरील ईडी कारवाईचा निषेध

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना  प्रकारे नाहक त्रास दिला जातोय, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आज  तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देऊन, ईडीचा निषेध करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले की, भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी वारंवार सांगितले आहे की, हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे. सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही हा व्यवहार मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरलेली आहे. श्री. खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना जाणीवपूर्वक ईडीकडून त्यांना बोलावण्याचा प्रश्न न काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!