गाळे जप्तीच्या कारवाईची जय्यत तयारी

जळगाव प्रतिनिधी | शहरातल्या विविध व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे थकबाकी असलेले तब्बल २२० कोटी रूपयांच्या वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईची जय्यत तयारी केली आहे.

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांकडे तब्बल २२० कोटी वसूल करायचे असल्याने ऍक्शन मोडमध्ये येत पालिकेने दोन दिवसांची मुदत दिली आहे. गुरुवारपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास थकबाकीदारांच्या गाळ्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

महापालिका प्रशासनाने वसुलीचे सर्व प्रयत्न करून देखील याला यश मिळत नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. मंगळवारी दिवसभरात तीन लाखांची वसुली झाली. मात्र ही रक्कम तुलनेत खूप तोकडी असल्याने प्रशासन आता कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. प्रशासनाने १२ बँकांमधील गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर गुरूवार नंतर थेट जप्तीची कारवाई होऊ शकते.

Protected Content