जळगाव पोलिसांच्या वाहनास अपघात; दोन कर्मचारी जखमी

जळगाव प्रतिनिधी | मालेगावजवळ जळगाव पोलिसांच्या शासकीय वाहनाला झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील पोलिस चौकीजवळ जळगाव पोलिसांच्या वाहनास कंटेनरने धडक दिल्याने दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे शासकीय सुमो वाहनाने (क्रमांक- एमएच १९ एम ०७४१) मालेगावहून जळगावला परतत असतांना हा अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

या अपघातात बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे दोघे कर्मचारी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content