जप्त केलेल्या वाहनांचा ८ फेब्रुवारी रोजी होणार लिलाव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहे.

या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. तथापि, संबंधित वाहन मालकांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 से 184 मधिल तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून नमुद तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातून येणारा महसूल शासनास जमा करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आले आहे. त्यानुसार खालील वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया 28 फेब्रुवारी, 2023 रोजी करण्यात येईल, असे तहसीलदार, चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

वाहन क्रमांक MBNAV 53ACKCH32138, ट्रॅक्टर ट्रॉली – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचेकडील ट्रॅक्टर व ट्रॉली याचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 10 हजार रुपये. वाहन क्रमांक MH19CY4359 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19P3394 (चेसीस क्र. 99FO36702627) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 1 लाख 80 हजार रुपये, MH19CZ9527 (चेसीस क्र. MBNAV53 ACMCD80238) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19CZ0543 ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, MH19DV1553EK) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 5 लाख 10 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. DZVST 683072S3) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 4 लाख 40 हजार रुपये, विना नंबर (चेसीस क्र. 97E3690112) ट्रॅक्टर व ट्रॉली यांचे मुल्यांकन रक्कम 20 हजार रुपये याप्रमाणे आहे.

Protected Content