जिल्ह्यात चोरी करणारे सराईत दोन गुन्हेगार अटकेत

WhatsApp Image 2019 11 12 at 7.57.59 PM

जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात दोन तर अमळनेरात एक ठिकाणी चोरी केल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

शांताराम उर्फ शाम्या प्रताप कोळी आणि संजय पांडुरंग बाविस्कर दोन्ही रा. हातेड ता. चोपडा असे दोघा संशयित आरोपीचे नाव आहे. दोघांनी तीन ठिकाणी वेगवेगळ्या घटनेत चोरी करून मुद्देमाल लंपास केल्याचा गुन्हा कबुल केला आहे. यात अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मोटरसायकल तर चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात संगणकाची चोरी आणि टिव्ही यांची चोरी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून दोघांना या गुन्ह्यात अटक केली आहे. दोघांना पुढील कारवाईसाठी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Protected Content