डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात मादाम मोंन्टेसरी यांना अभिवादन

WhatsApp Image 2019 09 01 at 4.47.15 PM

 

जळगाव, प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालया,पूर्व प्राथमिक विभागात बालस्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार ३१ ऑगस्ट रोजी  मादाम मोंन्टेसरी बाई यांच्या वाढदिवसानिमित्त बालस्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर, रोहिणी कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांचा हस्ते मोंन्टेसरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख केतकी बालाजीवाले या होत्या. ” हिप्पी हिप्पी यंमा यंमा” हे गीत रोहिणी कुलकर्णी यांनी सादर केले. याप्रसंगी शाळेतील परिसर सुशोभित करण्यात आला. मैदानी व बैठे खेळ घेण्यात आले. मुलांनी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. मुलांना केक वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content