पाचोरा येथे शिवसेनेच्यावतीने सत्कार सभारंभ (व्हिडीओ)

pachora 3

पाचोरा प्रतिनिधी । येथे पाचोरा-भडगाव तालुका शिवसेना-युवासेना पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांच्यावतीने आज दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महालपुरे मंगल कार्यालयात तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणरावजी पाटील आणि म्हाडा अध्यक्षपदी शिवराजीराव ढवळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शिवसेना उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, गणप्रमुख, उपगणप्रमुख, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, मार्केट कमिटी संचालक, नगरसेवक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख, विविध शिवसेना संलग्न पदाधिकारी तसेच गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख पाचोरा), गणेश परदेशी (शिवसेना उपजिल्हाप्रमुख भडगाव), शरद पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख पाचोरा), डॉ.विलास पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख भडगाव), किशोर बारवकर (शिवसेना शहरप्रमुख पाचोरा), मनोहर चौधरी (शिवसेना शहरप्रमुख,भडगाव) आणि आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीतीत होते.

Protected Content