मोठे होणे म्हणजे सुखाची झोप येणे – गिरीश कुळकर्णी

WhatsApp Image 2019 09 08 at 5.50.30 PM

जळगाव, प्रतीनिधी | मोठे होणे म्हणजे सुखाची झोप येणे, मोठे होणे म्हणजे विचार करून जगणे ,मोठे होणे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करणे असे प्रतिपादन आशा फाऊंडेशनचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी केले. ते क्षत्रिय माळी सेवा मंडळ ,जळगाव येथील संस्थेच्या संत सावता प्रगतीशील शेतकरी पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर शिंदखेडा तहसीलदार सुदाम शिवराम महाजन, संस्थेचे अध्यक्ष व जिप सदस्य नानभाऊ पोपट महाजन ,आत्माराम गंभीर, रमेश चव्हाण , शशिकला प्रभाकर महाजन आदी उपस्थित होते. यासत्कार समारंभात लासुर येथील शेतकरी सुरेश उत्तम माळी यांचा “संत सावता महाराज प्रगतिशील शेतकरी पुरस्कार” देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता १ली ते पदव्युत्तर वर्गातून समाजातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp Image 2019 09 08 at 5.49.44 PM

प्रमुख पाहूणे सुदाम महाजन यांनी मनोगतात ‘अहिराणी’ही आपली मातृभाषा आहे आणि तिचे जतन व संवर्धन करने आपल्या हाती असल्याचे सांगितले. बालपणात पाठीवर पडलेली कौतुकाची थाप आपले अवघ जीवन कसे बदलून टाकते हे त्यांनी यावेळी सोदाहरण स्पस्ट केले. सूत्रसंचालन प्रमोद माळी व गिरीश जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी हिरालाल चव्हाण, राजेंद्र महाजन, प्रवीण माळी, रवींद्र महाजन, अनिल शेलकर, राकेश महाजन, रमेश चव्हाण, रतन महाजन, विठ्ठल राजोळे, योगिता महाजन, सोनाली जाधव, विमलबाई माळी, कल्पना महाजन आदींनी कामकाज पाहीले.

Protected Content