कानबाई मातेच्या जागराने चाळीसगावकरांना केले भावविभोर ! ( व्हिडीओ )

kanubai utsav chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कानबाई मातेच्या जागर या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस गितांनी चाळीसगावकरांना अक्षरश: भावविभोर केल्याचे दिसून आले.

मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित एकदंत कला महोत्सवांतर्गत सिताराम पहेलवान मळा येथे कानुबाई मातेच्या गीतांचा कार्यक्रम प्रचंड जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात एकदंत स्वरूप गणरायांची आरती करून झाली. मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात आपली भूमिका मांडतांना सांगितले की, कानुबाई माता ही खान्देशातली आराध्यदैवत आहे. या देवतेच्या चरणी एकदंत कला महोत्सवाच्या निमित्ताने लिन होता यावे यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने सहभागी होत आहात, यापुढील कार्यक्रमातही सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात डोंगर हिरवा गार गृप (गोल्डन बँड), शिरपूर यांनी कानुबाई मातेची विविध गाणी सादर केली. यामध्ये डोंगर हिरवा गार व माय मना डोंगर हिरवा गार, कानबाई ऊनी व चाळीसगावले, नाचत ऊनी व चाळीसगाव ले, डोंगरले लागी गई वाट- वाट मनी कानबाई नी अशा कानबाई मातेच्या गीतांमध्ये धार्मिक वातावरणामध्ये भाविक रममाण झाल्याचे दिसून आले.

कानुबाई माता खान्देशातील आराध्यदैवत आहे. ग्रामीण बोली भाषेत, अहिराणी भाषेत बरीच गाणी म्हटली गेली. प्रत्येक गाण्यावर उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. काही महिलांनी व पुरुषांनी तर गाण्यावर ठेका धरला. तर भक्तीभावाने वातावरण अगदी भावविभोर झाले होते. महिला वर्ग व अबालवृद्धांची संख्या लक्षणीय होती. अनेकांनी देहभान विसरून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भावेश कोठावदे यांनी केले. दरम्यान, शस्त्र प्रदर्शन व गड किल्ले चित्रप्रदर्शन तसेच प्रभाकर सिंग यांचे शिल्प प्रदर्शन चाळीसगावकरांनी पाहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास युवा नेते मंगेश चव्हाण यांच्यासह अ‍ॅड.धनंजय ठोके, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, नगरसेविका विजयाताई पवार, वैशालीताई राजपूत, संगीताताई गवळी, नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, बापु अहिरे, चंदु तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश महाराज, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, अमित पाटील, शैलेश कोठारी, सरदार राजपूत, सह्याद्री प्रतिष्ठानचे दीपक राजपूत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, जितेंद्र वाघ, आण्णा गवळी, शांताराम पाटील, भैय्या पाटील, सुभाष जैन, कैलास पाटील, भिकन वाणी, किशोर भाऊ, अनिल चौधरी, एस.डी.पाटील, साहेबराव साळुंखे, आदी उपस्थित होते.

पहा : कानबाई मातेच्या गाण्यांच्या रंगलेल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ.

Protected Content