विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय विवाहितेवर तिच्या दिरानेच बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे . याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय विवाहिता तिच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान संशयित विक्की गणेश बडगुजर रा. कोळीवाडा’ बोरनार ता. जळगाव याने विवाहितेवर फोनवर बोलणे झाल्याची रेकॉर्डिग तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले . याप्रकरणी विवाहितेने रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यावरून संशयित विकी बडगुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत .

Protected Content