शासकीय योजनांच्या लाभार्थींची ससेहोलपट थांबवा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शासकीय योजनांच्या लाभार्थीच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, कोरोनाच्या संकटामुळे असंख्य लोकांच्या नौक-या गेल्या असून या व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत.  देशात  आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. या परिस्थितीतून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवून अशा कुटुंबांचे जिवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  परंतु सदरहू योजनांसाठी आवश्यक अर्थपुरवठा करण्याची जबाबदारी असून देखील बँक अधिकारी अशा लाभार्थीना फक्त चकरा मारायना लावून टाळाटाळ करीत आहेत. तसेच काही शासकीय अधिकारी अनुदान वितरीत करतांना लाभार्थींना उगाचच त्रास देऊन पैशांची मागणी करीत असल्याने मनसेच्या निदर्शनास आले आहे. सर्व बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक घ्यावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजना निहाय किती लाभार्थींना कर्ज वितरीत करून उद्दीष्ट पूर्ती करण्यात आली ही आकडेवारी जाहीर करावी. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून पात्र लाभार्थींना अनुदान व पुरवठापासून वंचित ठेवणाच्या अन् कामात कुचराई करणाऱ्या बँकेच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांची नांवे जाहीर करावी.

यावेळी ज्या बेरोजगार तरुण तरुणींची कोणत्याही  शासकीय कार्यालयात कामे अडवली गेली असेल त्यांनी मनसेच्यापदाधिकान्यांशी संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान,  पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना शासकीय योजना राबविणारे अधिकारी व बँक मनेजर यांची बैठकीचे आयोजन करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे जळगाव उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले.

याप्रसंगी निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष जमील  देशपांडे, जळगाव उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, राजू निकम, चेतन अढळकर, विनोद शिंदे,  जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content