जळगाव : कोरोना कक्षात अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णाचा मृत्यू ; मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना कक्षात अ‍ॅडमिट असलेल्या एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे मृत्यूचे कारण अस्पस्ट आहे.

कोरोना कक्षात ऍडमिट असलेल्या एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. परंतू या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे मृत्यूचे कारण अस्पस्ट आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवीन तीन रूग्णांना दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत ७१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून त्यातील ४१ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर २७ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहे. कोरोना विषाणूचे पडसाद आता जिल्ह्यात जाणवू लागले आहे. दोन दिवसांपुर्वीच एक रूग्णाला कारोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. दोन दिवसांपुर्वी रूग्ण आढळून आल्यामुळे जळगावातील मेहरूण परीसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्ण हा मेहरूणमधील नसून तो दुसर्‍या गावातील असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

सोमवारी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे तीन रूग्णांना कोरोना कक्षात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७१ जणांची रिपोर्ट नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यातील ४१ जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले तर २७ जणांचे मेडीकल रिपोर्ट प्रलंबित असून १ रिपोर्ट संक्रमित तर दोन रिपोर्ट रिजेक्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचे आधिष्ठात डॉ.खैरे यांनी दिली होती.

हे देखील वाचा : घाबरू नका…पण जागरूक रहा ! – जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

Protected Content