शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्याने निर्धास्त असणार्‍या जळगावकरांना धक्का देणारी बातमी समोर आली असून शहरातील एका रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

जळगावात आजवर अनेक संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कुणी पॉझिटीव्ह आला नव्हता. तथापि, आज सायंकाळी एका रूग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधीत रूग्ण हा शहरातील मेहरूण भागातील रहिवासी असून तो काही दिवसांपूर्वी दुबई येथून आल्याची माहिती मिळाली आहे. याचे वय ४९ वर्ष असून त्याच्यावर आता जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या व्यक्तीसोबत जिल्ह्यातील एक २४ वर्षाचा तरूण आणि १६ वर्षांच्या युवतीचे नमुने कालच कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील संबंधीत तरूण आणि युवतीचे नमूने निगेटीव्ह आले असून ४९ वर्षाच्या व्यक्तीचा नमूना मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

हे वृत्तदेखील वाचा : कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !

Protected Content