कोरोनाबाबत उन्मेष पाटील यांची अधिकार्‍यांसोबत चर्चा

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून याच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या उपाययोजना तसेच केंद्राने घोषित केलेल्या अन्न धान्य पुरवठा नियोजन लवकर व्हावे, तसेच ग्रामपंचायतींना खासदार निधीतुन कोरोनाबाबत वैद्यकीय सुविधा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा घेत चर्चा केली. यावेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे,जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घोषित केलेल्या एक लाख सत्तर हजार कोटींच्या विविध मदतीची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच कोरोनाबाबत जिल्हयातील आजची परिस्थिती काय आहे.त्याबाबत सुरू असलेल्या उपाययोजना जाणून घेत काही सूचना दिल्यात तसेच खासदार निधीतून करावयाच्या आवश्यक वैद्यकीय सेवा बाबत चर्चा झाली यावेळी उभयतांनी सोशल डिस्टन्स पाळत जिल्ह्यातील परिस्थितीवर सखोल माहिती जाणून घेतली.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी लॉकडाऊन मध्ये नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे .केंद्र सरकारने दिलेली मदत तात्काळ आपल्या पर्यंत पोहचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. त्यांचे समवेत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content