जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे विविध मागण्यांसाठी निर्दशने (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना २०१७ पासून कल्याणकारी मंडळाचे थकीत लाभ मिळत नसून ते त्वरित मिळावेत व इतर मागण्यासाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यलयावर निदर्शने करण्यात आली.

 

सीटूचे जिल्हा सचिव कॉ. विजय पवार यांनी आंदोलना मागची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, २३ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आला. यात बांधकाम कामगारांच्या नोंदण्या, नूतनीकरण, कल्याणकारी मंडळाचे लाभ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात करायचे आहेत. मात्र, येथे कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसे घेवून बोगस कामगारांची नोंदणी केली जात आहे. यात बांधकामाच्या कोणत्याही कामाशी संबधित नसलेल्या रिक्षावाले यांची नोंदणी केली जात आहे. शासनाच्या कल्याणकारी मंडळामध्ये एक टक्का उप करातून जो सेस जमा झाला आहे, याचा लाभ खऱ्या कामगारांना न मिलता बोगस कामगारांना मिळत आहे. बांधकाम कामगारांचे मागील २ वर्षांपासून विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यात शिष्यवृत्ती, दवाखाना, प्रसूती, लग्न , मुलांचे शाळांचे प्रकरणे, औजार खरेदी अनुदान, प्रशिक्षणासाठी असलेले ४२०० रुपये अनुदान व कोविड अनुदान मिळालेले नाही. कामगारांच्या मागणीवरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भांडे वाटप रद्द करण्यात आली. मात्र, त्याच्या अनुदानाची रक्कम अद्यापही कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही. कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नसल्याने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांनी दिवाळीच्या आठ दिवसाआधी ही रक्कम नोंदीत कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/589709302171081

Protected Content