बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांचे पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महा विकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध झाले असून पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता यात धरणगाव आतून संजय मुरलीधर पवार एरंडोल मधून अमोल चिमणराव पाटील तर पारोळा येथून आमदार चिमणराव पाटील या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी जिल्हा बँक निवडणूक  लढवत असून त्या  अनुषंगाने आज तीन उमेदवार बिनविरोध निवडून निवडून आल्यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे . दरम्यान आज दुपारी तीन वाजता तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी तीन उमेदवारांना कॉल करून त्यांचे कौतुक केले यानंतर संजय मुरलीधर पवार यांचे पेढा भरून पालकमंत्र्यांनी कौतुक केले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Protected Content