नूतन मराठा महाविद्यालयाची संयुक्ता ‘जेईई’ परीक्षेत देशात १५८ व्या क्रमांकावर

जळगाव प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालयाची संयुक्ता नंदकिशोर पाटील ही देशभरात घेतल्या गेलेल्या “जेईई” परीक्षेत देशात १५८ व्या क्रमांकावर आली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्याहस्ते संयुक्ताचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात घेण्यात आलेल्या जेईई अँडवान्स परीक्षेत संयुक्त पाटील हिला २९२ मार्क मिळाले. कॉमन रँक यादीमध्ये तिने संपूर्ण भारतात १५८ वा क्रमांक मिळवला आहे. निवड झालेल्या सुमारे ४३ हजार विद्यार्थ्यांमधून तिने हा क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. देशमुख यांच्यहस्ते सत्कार झाला. यावेळी उप्राचार्य डॉ.ए.बी. वाघ उपस्थित होते. प्राचार्य देशमुख म्हणाले की, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी संयुक्ताची नोंद घेतली जाणार आहे. तिच्या यशामुळे १० वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २०१० साली महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी आयआयटी, नीट व व्ही.आय.टी. (वेल्लोर) येथे प्रवेशित झाले होते. असेही ते म्हणाले. यावेळी मविप्र संस्थेचे चेअरमन नीलकंठ काटकर, मानद सचिव निलेश भोईटे यांनीही संयुक्ता पाटीलची कौतुक केले.

यावेळी संयुक्ता पाटील हिने,आयआयटी (पवई) किंवा दिल्ली येथून संगणक शास्त्रामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त करून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्ताचे उपप्राचार्य डी. टी. बागुल , प्रा. एस. ई. पाटील यांच्यासह तिचे वडील नंदकिशोर पाटील, आई हेमांगी, आजोबा कडू दीपचंद पाटील, तसेच परिवारासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content