पहूर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना एनर्जी बुस्टरचे वाटप

पहूर, ता जामनेर प्रतिनिधी । पहूर ग्रामीण रुग्णालयात जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून  रुग्णांना जगत फर्मा कंपनीतर्फे मलमीना एनर्जी बूस्टरचे वाटप करण्यात आले.

सदरच्या बूस्टरमध्ये विटामिन बी, बीटा कॅरोटीन, झिंग, आयरन, सेलेनियम आदीसह आंबा, हळद, अँटिक ऑक्साईड युक्त घटक आहेत. जे जिवाणू- विषाणू विरुद्ध कोरोणा रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविते. सदरची मलविना प्रॉडक्ट पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याने शरीरासाठी उपयुक्त आहे. जगत फर्माचे वैद्यकीय जनसंपर्क प्रतिनिधी नरेंद्र चव्हाण यांनी सदर माहिती दिली. 

यावेळी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , आरोग्य दूत अरविंद देशमुख, सरपंच पती रामेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ . जितेंद्र वानखेडे , संदीप बेढे , विजय पांढरे , गणेश , रवींद्र घोलप, चेतन रोकडे, राजू जाधव, देवेंद्र घोंगडे, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान, पहूर ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णांसाठी  ऑक्सिजन सुविधेसह विविध सुविधा आणि योग्य उपचार  मिळत असल्याने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक रुग्णांनी करुणावर यशस्वीरीत्या मात केली आहे . त्याबददल यंत्रणेसह दात्यांचे कौतुक होत आहे. शंकर भामेरे यांनी सुत्रसंचलन केले. 

 

Protected Content