जिल्ह्यात आज कोरोनाचे १२८ रूग्ण आढळले; २३८ रूग्ण घरी परतले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या अहवालात जिल्ह्यातून १२८ रूग्ण कोरोना बाधित आढळले असून आजच २३८रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९३.५४ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यातच आज दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – ३४, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-१८, अमळनेर-२२, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-३, धरणगाव-३, यावल-९, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-२, बोदवड-६, इतर जिल्हा-२ असे एकुण १२८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९३.५४ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ६९७  रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ३५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२३७ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार २०५ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content