कोरोना : जिल्ह्यात आज १०१२ बाधित रूग्ण आढळले तर ९९५ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात एकुण १ हजार १२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ९९५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह बोदवड आणि एरंडोल तालुक्यात संसर्ग वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १६३, जळगाव ग्रामीण-५६, भुसावळ-४९, अमळनेर-४६, चोपडा-५३, पाचोरा-५९, भडगाव-३३, धरणगाव-२७, यावल-२६, एरंडोल-१००, जामनेर-५९, रावेर-९६, पारोळा-३७, चाळीसगाव-६४, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२० आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार १२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण १ लाख १८ हजार ९२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार ९०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर उर्वरित १० हजार ९०५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.