दुर्गोत्सवानिमित्त रावेरात शांतता समितीची बैठक

रावेर प्रतिनिधी । आगामी नवरात्रोत्सवानिमित्त आज येथील पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

रावेर  पोलिस स्टेशनला दुर्गा देवी उत्सवा निमित्त दुर्गादेवी मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची मिटींग घेण्यात आली. यामध्ये शासनाकडुन आलेल्या मार्गदर्शक सुचनाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यात सार्वजनिक मंडळाने ४ फुटाची व खाजगी मंडळाने २ फुटाची मूर्ती बसवावी, आगमन व विसर्जन मिरवणूक परवानगी नाही वगैरे सूचना देण्यात आल्या आहेत.

ही बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे अध्यक्षतेखाली  पार पडली आहे. आम्ही पो नि रामदास वाकोडे, एपीआय मनोज वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content