चितोडा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फ एकदिवसीय शिबिर संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा  मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवसीय शिबिर नुकतेच चितोडा येथे संपन्न झाले.  या शिबीराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सलीमा तडवी उपस्थित होत्या.

 

प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी शिबिराच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. याप्रसंगी चितोडाच्या सरपंच सलीमा तडवी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  त्यानंतर स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच स्त्री-पुरुष समानतेवर गावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्त्री- पुरुष समानतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी हा रॅली मागील उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधा खराटे यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. जी. भंगाळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका  कुंदा गाजरे, शिक्षिका अनिता कोल्हे, गणेश जाधव,  भारती सोनवणे, नवमेश तायडे, सचिन बारी, यतीन पाटील, समीर नेवे, प्राची पाटील ,तेजश्री कोलते चेतना कोळी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content