भरधाव कारने दुचाकीस्वराला उडविले; एक ठार, एक जखमी

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ धुळ्याकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी घडली आहे. या संदर्भात रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शालिदर जाधव वय २९ रा.मालेगाव जि.नाशिक असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

राजेंद्र जाधव आणि त्याचा मित्र संभाजी शिवाजी पाटील वय-४७, रा.सोयगाव मालेगाव जि.नाशिक हे दोघेजण शनिवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच ४१, बीक्यू २८१७)ने चाळीसगावकडून धुळ्याकडे जात होते. त्याच वेळी दैवत फाट्याजवळ धुळ्याकडून चाळीसगावकडे जाणारी कार क्रमांक एमएच १९ डीव्ही ०५०५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेला राजेंद्र जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला तर संभाजी पाटील हे गंभीर जखमी झाले. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बत्तीस एक करीत आहे.

Protected Content