


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर येथील बस स्थानकाजवळ काहीही कारण नसताना एका तरुणाला लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या संदर्भात रविवारी २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर गावात दिगंबर प्रभाकर काळे वय-४० हा तरुण वास्तव्याला आहे. शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दिगंबर हा गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या दुकानावर बसलेला असताना गावात राहणारे सुशील संतोष साबळे, भिकन विष्णू साबळे, सौरव खडके आणि गौरव खडके या चौघांनी काही कारण नसताना डिगंबर काळे याला लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याचा डावा हाताचा पंजा आणि पायांवर गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत दिगंबर काळे आला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात दिगंबर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता मारहाण करणारे सुशील संतोष साबळे, भिकन विष्णू साबळे, सौरव खडके आणि गौरव खडके या चौघांनी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील करीत आहे.


