रावेरमध्ये ८२ ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर : राजकीय हालचालींना वेग

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गणितांमध्ये बदल झाला असून, काही ठिकाणी खुले आरक्षण आल्याने सत्तासंघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. गावपातळीवरचे पुढारी आणि इच्छुक उमेदवार यांच्यात कुठे आनंदाचे वातावरण आहे तर कुठे नाराजीही दिसून येत आहे.

तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण जाहीर करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर.डी. पाटील, मंडळ अधिकारी सचिन पाटील, विठोबा पाटील, यासीन तडवी आणि भूषण कांबळे यांनी सहभाग घेतला.

आरक्षणानुसार, चिनावल (एसटी महिला) व खानापूर (एससी महिला) या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या असून, मोरगाव बुद्रुक आणि मोरगाव खुर्द या दोन्ही ठिकाणी महिला उमेदवारांसाठी आरक्षण असल्याने तेथे महिलाराज दिसणार आहे. याउलट, दोन्ही केऱ्हाळा (बुद्रुक आणि खुर्द) सरपंच पदासाठी खुले आरक्षण आल्याने स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अनुसूचित जाती (महिला): कुंभारखेडा, मांगी-चूनवाडे, पाडले खुर्द, धामोडी, कळमोदा, खानापूर, विवरे खुर्द

अनुसूचित जमाती (महिला): चिनावल, भोर, सुदगाव, दोधे, थेरोळे, वाघोड, मस्कावद सीम

नामनिर्दिष्ट मागासवर्ग (महिला): उटखेडा, सुनोदा, अजनाड-चोरवड, विवरे बुद्रुक, रणगाव, खिर्डी बुद्रुक, वाघाडी, अजंदे

सर्वसाधारण (महिला व ओपन): रेंभोटा, पुरी-गोलवाडा, गाते, कोचुर खुर्द, गौरखेडा, भोकरी, रायपूर, कोळोदे, केऱ्हाळा खुर्द, वडगाव, तासखेडा, बलवाडी, केऱ्हाळा बुद्रुक, रोझोदा, निंभोरा बुद्रुक, धुरखेडा, दसनूर-सिंगनूर आणि इतर ग्रामपंचायती

या आरक्षणानंतर अनेक गावांत नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असली तरी काही दिग्गज नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका हे आरक्षण लक्षात घेऊनच अधिक चुरशीच्या होणार आहेत, यात शंका नाही.

Protected Content