धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रुग्णालय धरणगाव अंतर्गत शहरात राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. माननीय जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण आणि वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धरणगाव डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. तसेच, शहरातील नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल जागरूक करण्यात आले. गप्पी माशांचे महत्त्व आणि डास नियंत्रणातील त्यांची भूमिका नागरिकांना समजावून सांगण्यात आली.
या जनजागृती अभियानादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आले. या उपक्रमात आरोग्य पर्यवेक्षक एस.आर. भंगाळे, आरोग्य निरीक्षक ए. एस. भोई, आरोग्य सेवक आर.के. देशमुख, एम.पी. माळी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराविषयी सखोल माहिती दिली आणि आरोग्य शिक्षण प्रदान केले.