गांजाचा नशा करणाऱ्या दोघांवर कारवाई; गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात अवैधपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई केली आहे. त्यांच्याकडून नशा करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. याबाबत रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात काहीजण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करत आसीफ खान आलीयान खान वय ४२ आणि शेख मेहेमुद शेख महेबुब वय ५३ दोन्ही राहणार तांबापूरा,जळगाव यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा आणि साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.