गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत काढा , अन्यथा गुन्हे दाखल करू – सपोनि काळे

WhatsApp Image 2019 09 07 at 8.38.18 PM

पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी | गणेशोत्सवासारख्या उत्सवात सर्व जातीधर्माच्या बांधवांनी एकत्र यावे , कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, जे लोक कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी केले .

ते पहूर पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन मिरवणूक आणि मोहरम निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते .पहूर येथे ११ मंडळांनी श्रींची स्थापना केलेली आहे. यातील आदर्श मंडळांना बक्षीसे देवून गौरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ,रामेश्वर पाटील ,आर. बी. पाटील, शैलेश पाटील , मनोज जोशी, राजू जेटलमन आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच लक्ष्मण गोरे, संजय देशमुख , अॅड . संजय पाटील, साहेबराव देशमुख, पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश पांढरे, योगेश भडांगे, शंकर घोंगडे, भिका पाटील, समाधान पाटील, किरण खैरनार, युसूफ बाबा , विश्वनाथ वानखेडे, अनिल अहिरे, प्रवीण देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Protected Content